अहमदनगरमहाराष्ट्र

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या ‘या’ मागणीला यश

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य  शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून इयत्ता १ ते ९ वी साठी १५ मे २०२१पासून राबवण्यात येणा-या विद्यार्थ्याच्या स्वाध्याय उपक्रमास स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे व राज्यसंघटक राजेंद्र निमसे  यांनी दिली .

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने १४ मे २०२१ रोजी विद्या प्राधिकरण, पुणे यांना निवेदन देवून गेली वर्षभर विद्यार्थ्यांनी कोविड १९च्या या कठीण परिस्थितीत आँफलाइन व आँनलाइन अध्ययन केले आहे. व उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना बौध्दिक विश्रांतीची गरज असून शिक्षकही सध्या करोना संबधी विविध कामे करत आहेत. या अतिरिक्त कामाचा ताण शिक्षकांवर पडणार असल्याचे म्हटले होते. तसेच घराघरात अनेक रुग्ण असतांना या भयग्रस्त वातावरणात कोणतंही शैक्षणिक वातावरण नसतांना हा उपक्रम उन्हाळी सुट्टीत राबवण्याचा अट्टाहास का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.  शाळा सुरु झाल्यानंतर या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी व सर्व विद्यार्थ्यांना छापील स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करुन देण्याची मागणी संघटनेमार्फत करण्यात आली होती.

या निर्णयाचे स्वागत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद वाढेंकर, जिल्हा कोषाध्यक्ष संजय शेळके, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय परहर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप भालेराव, पदवीधर जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, सांस्कृतिक संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर शेळके,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी  ढाकणे, ज्ञानदेव उगले , मधुकर डहाळे,सुधीर रणदिवे ,विलास लवांडे, ज्ञानदेव कराड आदी पदाधिकारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button