अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘तो’ आदेश काढला…!

अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती खुल्या करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी बाजार समिती अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार बाजार समिती मध्ये सकाळी ७ ते ११ यावेळेत भाजीपाला, फळं, शेतिमाल खरेदी विक्री व्यवहार सुरू करता येतील. दि.२५ मे मध्यरात्री १२ वाजल्यापासून सदर आदेश लागू होतील. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कठोर निर्बंध जारी करण्यात आले होते. त्या अनुषंगाने बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्री करता येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे बाजार समिती सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी हा निर्णय घेतला आहे. आता नेप्ती उपबाजार समिती, संगमनेर मधील वडगाव पान उपबाजार, राहुरी, राहाता, कोपरगाव, कोपरगाव व श्रीगोंदा येथील बाजार समितीचे व्यवहार खुले करण्यास परवानगी मिळाली आहे.