अहमदनगर

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

‘या’ ठिकाणी घडली घटना 

अहमदनगर : राहाता तालुक्यातील हनुमंतगाव शिवारात लोणी-सोनगाव रस्त्यावर ब्राह्मणे वस्तीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बळी गेला. शुक्रवारी रात्री मध्यरात्रीनंतर ही घटना घडली.एक वर्ष वयाचा नर जातीचा सदर बिबट्या होता. वन्यजीव प्राणी मित्र विकास म्हस्के यांना घटना कळताच घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेची माहिती नगरचे उपवन संरक्षण अधिकारी सौ. साने तसेच कोपरगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील, वनपाल बी. एस. काळे यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सुराशे यांनी घटनास्थळी येऊन मृत बिबट्याचा पंचनामा केला. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. खपके यांनी मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी केली. रावसाहेब ब्राम्हणे यांच्या गट नंबर २०० मध्ये बिबट्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.

Back to top button