अहमदनगरमहाराष्ट्र

अत्याचार करून पसार असलेल्या आरोपी तोफखाना पोलिसांनी केला जेरबंद

अहमदनगर : पुणे येथे महिलेवर अत्याचार करून पसार असलेल्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी नगरमध्ये अटक केली. आदित्य शंकर तवपुते (वय 29 रा. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहे. महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तवपुते विरोधात कोंढवा (पुणे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. घटना घडल्यापासून तो पसार झाला होता. सदरचा आरोपी नगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ वृद्धेश्वर कॉलनीत असल्याची माहिती तोफखान्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांना समजली. निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, पोलीस कर्मचारी शकीय सय्यद, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, शैलेश गोमसाळे, सचिन जगताप, संपदा तांबे यांच्या पथकाने आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली.

Back to top button