Travelअहमदनगर

अधिकारी, कर्मच्यार्यांनी हलगर्जीपणा केल्यास होणार कारवाई

महापौर, उपमहापौरांनी घेतली घनकचरा विभागाची बैठक

अहमदनगर : महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांना आपल्या कामाचा मोबदला दिला जात आहे. त्यांना दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पारा पाडून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, आम्ही कोणालाही बळजबरीने नहाक त्रास देण्याचे काम करत नाही. यापुढील काळात प्रत्येकाने चांगले काम करून स्वच्छ, सूंदर शहर ठेवण्याचे काम करावे, अन्यथा कागदावर घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, असे महापौर व उपमहापौर यांनी बैठक घेवून सांगितले.

   महानगरपालिकेत घनकचरा विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, उपयुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ.सतिष राजूरकर, घनकचरा विभागाचे अधिकारी डॉ.शंकर शेडाळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक सचिन शिंदे, निखिल वारे, सचिन जाधव, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार आदी सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

     यावेळी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, सध्या नगर शहरामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी थोड्याप्रमाणात वाढत चालली आहे. तरी महापालिका आरोग्य विभागाने या करोना रुग्णांनच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करून घ्यावी. जेणेकरून करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. शहरातील करोनाची रुग्ण संख्या शून्य कशी, होईल या मध्ये लक्ष केंद्रित करावे, तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात असे ते म्हणाले.   तसेच शहरामध्ये  ठिक-ठिकाणी कचर्याचे ढीग दिसत आहे. पूर्वी कचरा उचलल्यानंतर प्रत्येक प्रभागाप्रमाणे निर्जंतुकीकरण पावडर मारली जात होती, आत ती मारली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच चिकन, मटनचे वेस्टेज रस्त्याच्या तसेच ओढ्या नाल्याच्या बाजूला फेकले जाते, त्यामुळे कुत्र्यांचा मोठा उपद्रव वाढला आहे. याबाबत उपाययोजना कराव्यात,अशा सुचना दिल्या.

Back to top button