Travelअहमदनगरमहाराष्ट्र

अधिकारी राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याचे हातातील बाहुले ! ‘त्या’ माजी सभापतीचा आरोप

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात गटविकास अधिकारी यांशी झालेल्या हुज्जतीचे पर्यावसन वादात झाल्या कारणाने काल बाळासाहेब नाहाटा यांच्यावर सरकारी कामात अडथळा अंतर्गत गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल करण्यात तालुक्यातील राजकीय पुढाऱ्याचा हात असून, तहसीलदार व गटविकास अधिकारी हे राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याचे हाताचे बाहुले बनले आहेत असे नाहाटा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
लोणी ग्रामपंचायत मधील काही विकास कामात अनियमितता असल्याने नाहाटा यांनी माझ्यावर बूट उगारला हा गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी केलेला आरोप पुर्ण पणे निराधार असून, प्रशासन, मंत्री व नेते माझ्या पाठीशी आहेत, तुम्हाला गावचा कारभार करून देणार नाही. असे बोलून गटविकास अधिकारी काळे यांनी मला जाणीवपूर्वक भडकवले, असे नाहाटा यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात उल्लेख केला. पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत वादळी भूमिका मांडल्याने तालुक्यातील एका राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याने जाणीवपूर्वक सत्तेचा गैरवापर करून आपल्याला यात गुंतवले आहे. मी कोविड 19 काळात जनतेला केलेली मदत काही नेत्यांच्या डोळ्यात खुपत आहे.
त्यांना स्व काही करायचे नाही आणि दुसऱ्याला काही करून द्यायचे नाही असले नीच राजकारण करून मला बदनाम करायचे आहे.
सामान्य कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करून त्याला अडचनीत आणण्याचा हा डाव काही नवा नाही. यांच्या षड्यंत्रला भीत नाही.
या पूर्वी सुद्धा असे अनेक प्रयोग माझ्या बाबतीत झाले आहेत, त्यातील सर्व गुन्हे खोटे होते. न्यायालयाने ते गुन्हे रद्द केले आहेत.
राज्यातील मोठे नेते जर माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणेसाठी दबाव आणत असतील तर ही बाब निषेधार्ह आहे. प्रशांत काळे यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासल्यास कोण सूत्रधार आहे हे उघड होईल, अशी देखील त्यांनी मागणी केली.

Back to top button