अहमदनगर

अनलॉक नंतर दुचाकी चोर ही झाले सक्रिय

अहमदनगर – अनलॉक नंतर शहर व उपनगरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज दोन- तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या फिर्यादी पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. एकाच दिवशी तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या फिर्यादी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. सावेडीतील झोपडी कॅन्टींग येथून सुरज गणेश शाह (रा. डावरे गल्ली, नगर) यांची दुचाकी (एमएच 16 सीयु 7245) चोरीला गेली. शाह यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच सिटी सर्वे ऑफिस शेजारी गोविंद केशवलाल सोमानी (रा. सावेडी) यांची दुचाकी (एमएच 16 बीआर 1569) चोरीला गेली. सोमानी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी चोरीची तिसरी घटना नगर तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडली. नारायणडोह येथून अमित गोवर्धन जायभाय यांची दुचाकी (एमएच 17 झेड 4229) चोरीला गेली. जायभाय यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button