महाराष्ट्र

अनुदानासाठी शिक्षकांनी केले ‘ढोल बजाओ आंदोलन’

महासंदेश :- राज्यातील सर्व अंशतः अनुदानित , अघोषित त्रुटीअपात्र शाळांना १०० टक्के प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी सोमवारी (दि. ९ ऑगस्ट) क्रांतिदिनी राज्यभरात शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ढोल बजाओ आणि घंटानाद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

कायम विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे, आनंदा वारंग, जनार्दन दिंडे, गजानन काटकर, नेहा भुसारी,जयश्री पाटील यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. शिवाय प्रशासनाला निवेदन दिली. सरकारने महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित ( २० टक्के व ४० टक्के ) अघोषित अपात्र असणाऱ्या सर्व शाळांना मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सरसकट हा शब्द काढून पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा, १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यातील सर्व शिक्षक आमदारांच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला. याप्रसंगी सुनील कल्याणी, प्रकाश पाटील, शिवाजी खापणे , अनिल हायकर , शिवाजी कुरणे , शहाजी पाटील , शिवाजी खामकर , शिवाजी घाटगे , एम.एस.जाधव , राजू भोरे , सावंता माळी , भानुदान गाडे , उत्तम जाधव, कृष्णात पाटील, रामराजे सुतार , गौतमी पाटील , अनिल देसाई , बी व्ही बोराडे, बाबा पाटील, शैक्षणिक व्यासपीठाचे एस.डी. लाड, सी. एम. गायकवाड, आर. वाय. पाटील, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

Back to top button