अहमदनगरमहाराष्ट्र

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना आवाहन

अहमदनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त  केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांसाठी स्टँन्ड अप इंडिया ही योजना आणली असून राज्य शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  अन्वये जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील 18 वर्षावरील नवउद्योजक यांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजने अंतर्गत 75 टक्के कर्जमंजुर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मुल्याच्या 15 टक्के हिस्सा (अनुदान) शासनामार्फत देण्यात येते. तरी पात्र इच्छुक नवउद्योजकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाडरोड, अहमदनगर या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन राधाकिसन देवढे सहायक आयुक्त, समाज कल्याण, अहमदनगर यांनी केले आहे. 

Back to top button