अहमदनगर

…अन्यथा ‘एसपी ऑफिस हल्ला प्रकरणा’ची पुनरावृत्ती घडली असती! 

अहमदनगर : नगर शहराच्या स्थापना दिनी जुन्या महानगरपालिकेतील मनपा आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनामध्ये आमदार संग्राम जगताप समर्थकांनी धुडगूस घातला. जगताप आणि त्यांचे राष्ट्रवादीचे गुंड कार्यकर्त्यांना महापालिकेवर हल्ला करत तोडफोड करायची होती. त्यांनी खुर्च्यांची आदळा आदळ केली. बाटल्या फोडण्यासाठी उगारल्या. दहशत निर्माण केली. कोरोना काळात गुंडांचा जमाव गोळा करून मनपावर हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता. या घटनेतून नगर शहरात संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती होते की काय, अशी तणावपूर्ण परिस्थिती मनपात निर्माण झाली होती. असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 

जुन्या महानगरपालिकेमध्ये काल दुपारी तीनच्या सुमारास किरण काळे हे मनपा आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत लसीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते.
मात्र आधीपासून सुरू असणारी चर्चा पाहून वाट पाहणे पसंत केले. मात्र काही वेळात आमदार जगताप यांच्या चिथावणी वरून त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी काळे यांच्या वर हल्लाबोल सुरू केला. चार-पाच काँग्रेस पदाधिकाऱ्यांना जगताप यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी धरा रे, मारा रे अशी अरेरावी सुरू केली. जगताप यांनी त्यात तेल ओतायचे काम कले. त्यामुळे त्यांच्या गुंडांचा उत्साह अधिक वाढला. खुर्च्यांची आदळा आदळ सुरू झाली. बाटल्या फोडण्याचा प्रयत्न झाला. बाचाबाची सुरू झाली. 
मी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना एसएमएस करून या ठिकाणी तातडीने पोलिस बळ पाठविण्याची विनंती केली. काही वेळातच त्या ठिकाणी पोलिस पोहोचले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा आमदार जगताप आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी नगर शहराच्या स्थापना दिनीच नगर शहरात पुन्हा एकदा ‘एसपी ऑफीस हल्ला’ प्रकरणाची पुनरावृत्ती करत शहरात दहशत माजवण्याचा डाव यशस्वी केला असता. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button