कृषीमहाराष्ट्र

..! अन्यथा हाच बळीराजा तुम्हाला मातीत गाडेल !

महासंदेश : तुम्ही  बळीराजाचे नाव घेत सत्तेत आला आहात याचंही भान तुम्ही विसरलात, लक्षात ठेवा हाच बळीराजा तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय रहाणार नाही. अशी तीव्र टीका चित्रा वाघ यांनी सरकारवर केली आहे.
गेवराई येथील मोतीराम चाळक या शेतकऱ्याची भेट घेतल्यानंतर त्या बोलत होत्या.
बी-बियाणे खरेदीसाठी गेलेल्या एका शेतकऱ्यास नियम मोडल्याचे  कारण सांगून पोलिसांनी बेदम मारहाण केली. ही घटना गेवराई येथे घडली.
सध्या राज्यात १५  जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मात्र, शेतकरी आणि शेतीविषयक वाहतूकीसाठी राज्य सरकारने व स्थानिक प्रशासनाने परवागनी दिली आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी पोलीस आणि सामान्य माणसू यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे.  
लॉकडाऊनचे नियम आम्ही पाळतो. सकाळी अकरापर्यंत बी-बियाणे खरेदी करण्यासाठी आम्ही जातो तर पोलीस आम्हाला मारतात मग बियाणे आणि खते शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने बांधावर आणून द्यावे. जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका, अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Back to top button