अन ‘त्या’दोघांनी एकाच साडीने गळफास घेतला

अहमदनगर : एका विवाहित प्रेमी युगुलाने एकाच साडीने गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद येथे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सीमा ईश्वर कांबळे आणि सचिन गंगाधर पेटारेअशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावे आहेत.विशेष म्हणजे या घटनेतील प्रेयसी ही प्रियकरापेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, येथील वानखेडेनगरातील सचिन पेटारे हा प्लंबिंग आणि बांधकामाच्या ठिकाणी मजुरीची कामे करत असे, तर सीमा हिचा पती एका गॅस एजन्सीवर कामाला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वीच सचिनचा विवाह झाला. तर सीमा ही गृहिणी होती. सचिनची सीमाच्या पतीमार्फत तिच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांचे प्रेम जुळले होते. त्यांचे हे प्रेमप्रकरण सीमाच्या पतीला आणि सचिनच्या आई, बहिणीला माहिती होते. मात्र, सचिनची पत्नी या प्रेमप्रकरणापासून अनभिज्ञ होती. सचिन आणि सीमा नेहमी एकमेकांना भेटायचे. सचिन हा काम केलेले पैसे कधीही घरी देत नव्हता. त्याची आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. एक बहीण सातारा परिसरातील रुग्णालयात कामाला आहे. तर धाकटी बहीण आणि भाऊ शिक्षण घेतात. सीमाला एक मुलगी आणि दोन मुले आहेत. सचिन आणि सीमाला यापूर्वी त्यांच्या नातेवाइकांनी हे प्रेमप्रकरण थांबवा, अशी समज दिली होती. मात्र, दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते. अखेर दोघांनी एकाच साडीने छताच्या हुकाला गळफास घेतला.