अहमदनगरमहाराष्ट्र

अरेअरे ! सेल्फीचा मोह पडला महागात !

मुलाला वाचवताना वडिल आणि मामाचा मृत्यू

महासंदेश : ओसंडून वाहणाऱ्या पाण्याजवळ जाऊन जीवघेणा सेल्फी काढण्याचा मोह अनेक पर्यटकांना आवरता येत नाही. मात्र, हे प्रकार पर्यटकांच्या जीवावर बेतत असल्याचे वारंवार समोर येत आहे. मागील काही वर्षांपासून तरुणांमध्ये मोबाईलवर सेल्फी काढण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु अनेकवेळा धोकेदायक ठिकाणी सेल्फी काढताना दुर्घटना देखील घडतात. पण त्यासोबतच दुर्दैवाने यामध्ये काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच घटना मावळमध्ये घडली आहे. यात सेल्फी काढताना पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्याचे वडिल आणि मामाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात त्या मुलाचे प्राण वाचले मात्र वडिल आणि मामा गमावले.

याबाबत सविस्तर असे कि, मावळमधील कुंडमळा येथे राकेश लक्ष्मण नरवडे हे त्यांचा ८ वर्षांचा मुलगा आयुष नरवडे आणि त्याचे मामा वैष्णव भोसले यांच्यासोबत फिरायला गेले होते. यावेळी पाण्याच्या प्रवाहाजवळ उभं राहून आयुष सेल्फी काढत होता पण त्याला दगडांचा अंदाज न आल्यामुळे घसरून पाण्याच्या प्रवाहात पडला. यामुळे घाबरलेल्या राकेश आणि वैष्णव यांनी कोणताही विचार न करता थेट पाण्यात उडी घेतली. हा सगळा प्रकार लक्षात येताच जवळच मासे पकडणाऱ्या काही व्यक्तींनी पाण्यात दोरी टाकून मुलाला बाहर काढले, पण राकेश नरवडे आणि वैष्णव भोसले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

Back to top button