Travelअहमदनगर

…अरेरे अखेर ‘त्या’ चिमुरडीचा म्युकरमायकोसिसने घेतला बळी !

अहमदनगर : आज तब्बल दीड ते पावणेदोन वर्षांनंतर कुठेतरी सर्वसामान्यांच्या मनात असलेली कोरोनाची धास्ती कमी होत आहे. मात्र परत एकदा सर्वसामान्यांच्या मानगुटीवर म्युकरमायकोसिस या आजाराचे भुत बसले आहे. नुकतेच लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात अवघ्या ६ महिन्यांच्या चिमुरडीचा या आजाराने बळी घेतल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
शिर्डी शहरातील अवघ्या साडेपाच महिने वय असलेल्या चिमुकलीला अगोदर कोरोनाने गाठले मात्र त्याच्यावर तीने यशस्वलपणे मात केली. परंतु या दरम्यान तीला म्युकरमायकोसिस या आजाराची बाधा झाली. तिच्यावर सुरूवातील नाशिक व नंतर लोणी प्रवरा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.
या लहान मुलीला वाचवण्यासाठी प्रवरा ग्रामीण रूग्णालयातील सर्व डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र या प्रयत्नाना यश आले नाही. अन् उपचारादरम्यान या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  

Back to top button