महाराष्ट्र

अरेरे ! अवघ्या १२ वर्षाच्या मुलीने घेतला गळफास !

महासंदेश : अलीकडे लहान मुलांना पालक किरकोळ गोष्टीवरून रागवले तरीदेखील त्यांना राग येतो. त्यांनी काही हट्ट धरला अन तो पूर्ण केला नाही तर काही मुले आत्महत्या सारखे टोकाचे पाउल उचलतात. अशीच घटना औरंगाबाद येथील एन-११ हडको येथील नवजीवन कॉलनीत राहणाऱ्या एक अवघ्या १२ वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मंगळवारी संध्याकाळी या मुलीची आई मेसवर पोळ्या करण्यासाठी गेली असता तीने घराचा मेन दरवाजा लावून घेतला आणि समोरच्या रूम मध्येच छताच्या हुकला नायलॉन दोरीने गळफास घेतला.

ही घटना या मुलीच्या छोट्या भावाला समजली असता त्याने आरडाओरडा केला. यानंतर तिच्या मामांनी तिला खाली उतरवून घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी रात्री साडेआठ वाजता तपासून मृत घोषित केले. ती शाळेत सहावीच्या वर्गात शिकत होती. आई वडील आणि छोटा भाऊ हे चौघे जण सोबत राहत होते. आई मेसवर पोळ्या करण्याचे काम करत असून वडील खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यामुळे दिवसभर घरी केवळ ती व तिचा छोटा भाऊ राहत असत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली परंतु प्राथमिक तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही. या घटनेची सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Back to top button