अरेरे! नवविवाहित सोनाराचा खून

दोघेजण ताब्यात : एकजण पसार
नगर, दि.23 (प्रतिनिधी) – अवघ्या सहा महिन्यापूर्वीच विवाह झाल्याने अजून त्यांच्या अंगाची हळद देखील पूर्ण निघाली नव्हती. आपल्या नव्यानेच सुरू झालेल्या वैवाहिक आयुष्याचे स्वप्ने रंगवले होते. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. लग्नासाठी मोठ्या प्रमाणात सोने करण्याचे सांगून या तरूणाला बोलावून घेत त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशाल सुभाष कुलथे (वय २५) असे त्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर असे की,बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील सराफ व्यावसायिक विशाल सुभाष कुलथे यांना येथील सलुन व्यावसायिक ज्ञानेश्वर गायकवाड याने माझे लॉकडाऊनमध्ये लग्न झाले मात्र मला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करावयाचे आहे. असे सांगुन दागिने घेवून सलुनच्या दुकानात बोलावून घेतले. येथे आल्यानंतर त्यांचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील दत्तात्रय हरिभाऊ गायकवाड यांच्या शेतात खड्डा खोदून पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी केतन लोमटे व शिवाजी गायकवाड या दोघांना ताब्यात घेतले असून ज्ञानेश्वर गायकवाड हा पसार आहे.