अहमदनगर

अरे .. अरे विजेचा शॉक बसून शेतकऱ्यासह सात शेळ्यांचा मृत्यू !

अहमदनगर : कोरोनामुळे आधीच सलगच्या लॉकडाउनमुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. परिणामी बाजारपेठ बंद असल्याने शेतात असलेला मालाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यातून सावरत असतानाच त्यांच्यावरील संकटे थांबत नाहीत. पारनेर तालुक्यातील पळवे येथील एका  शेतकर्‍याचा शेळ्या चारत असतांना वीज वाहक तारेचा धक्का बसून त्या शेतकऱ्यासह  ७ शेळ्यांचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .  या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील पळवे खुर्द पाचरणे वस्ती येथील शेतकरी दामोदर पाचारणे हे आपल्या  शेळ्या शेतामध्ये चारत होते . यावेळी असताना वीजवाहक तार तुटल्याने शेळ्यांना विजेचा जबर धक्का बसून मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच शेतकरी पाचारणे हे शेळ्यांना वाचवण्यासाठी पुढे गेले मात्र त्यांनाही जोरदार विजेचा शॉक बसला आणि त्यांचाही मृत्यू झाला.
या घटनेबाबत माहिती कळताच  परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वीज वितरण कंपनीला विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी संपर्क साधला. मात्र संपर्क झाला नाही. त्यामुळे प्रवाह सुरूच होता. शेतकरी व शेळ्यांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button