अरे… अरे हे तर ‘भक्षक’ च !

म्युकर मायकोसिस नसतानाही काढला डोळा?
महासंदेश : सध्या एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच दुसरीकडे म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठया प्रमाणात वाढत आहेत. यात त्या रुग्णावर अनेक शस्रक्रिया कराव्या लागतात. अनेकदा काही अवयव देखील काढावे लागतात.असाच एक विचीत्र प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे. केवळ डॉक्टरच्या चुकीमुळे एका तरुणाला आपला डोळा गमवावा लागला आहे .
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, एका २५ वर्षीय तरुणाला करोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर त्याच्या दृष्टीवर थोडासा परिणाम झाल्याने तो अंबाजोगाई येथील मोठ्या रुग्णालयात गेला. तेथे त्याला ‘म्युकर मायकोसिस’ झाल्याचे सांगून त्याच्या सायनसवर शस्त्रक्रिया केली. दरम्यान त्याचा नमुना तपासणीसाठी पाठवला असता, त्याला ‘म्युकर मायकोसिस’ झाला नसल्याचे दिसून आले. मात्र, या शस्रक्रियाचे त्या रुग्णालयाने चारच दिवसांत अडीच लाख रुपयांचे बिल मात्र वसूल केले. या तरुणाचा डोळा काढला, तरीही लहान आणि मोठ्या मेंदूपर्यंत त्याचा संसर्ग पसरला आणि आता दुसऱ्या डोळ्यालाही त्याची लागण झाली. या परिस्थितीत त्याचा दुसरा डोळा वाचणेही शक्य नाही. अंबाजोगाई शहरात त्याच्यावर १५ दिवसांत तीनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
वास्तविक केवळ अवयव काढून टाकल्याने बुरशीची वाढ थांबते, हा गैरसमज असल्याचे सरकारी रुग्णालयांतील अनुभवी डॉक्टरांचे म्हणणे आहे.