अहमदनगरकृषीमहाराष्ट्र

अरे देवा: जिल्ह्यातील अनेक भागात
ओल्या दुष्काळाचे संकट …!

अहमदनगर : मागील आठवड्यापासून चालू असलेल्या पावसाच्या थैमानामुळे शेतांना तलावाचे स्वरूप आले असून खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातून पाणी वाहत असून संपूर्ण शेत जलमय झाल्याने खरीप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. हवामानाच्या अंदाजानुसार यापरिसरात अजुनही पावसाचा अंदाज असल्याने, खरिप पिकांवर ओल्या दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे.
ढगफुटीने नऊ बंधारे फुटले असून शेतीचे प्रचंड नुकसानझाले आहे.


पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथे मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे, कोल्हार मधील गर्भगिरी डोंगरावर ढगफुटी झाल्याने नऊ बंधारे फुटले असुन अनेकांच्या जमिनीचे  देखील मोठे नुकसान झाले आहे.


शेती मधील कांदे बाजरी अनेक पिकांचे नुसकान झाले आहे. पंचनामे चालु आहेत. नुसकान भरपाई मिळेल अशी आशा आहे. फुटलेले बंधारे तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे प्रशासनाने तातडीने या बंधाऱ्याची पहाणी करण्यासाठी अधिकारी पाठवूण उपाय योजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली.

Back to top button