अहमदनगरमहाराष्ट्र

अरे देवा: पती-पत्नीसह मुलीची आत्महत्या..!केडगाव येथील घटना

अहमदनगर : कर्जाला कंटाळून पती-पत्नी सह मुलांनी आत्महत्या केल्याची घटना शहरातील केडगाव भागांमध्ये घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या ठिकाणी एक चिट्ठी सुद्धा आढळून आलेली आहे.

आत्महत्या केलेल्या मध्ये संदीप दिनकर फाटक( 45 ),किरण संदीप फाटक (32),मैथिली संदीप फाटक (10) अशी त्यांची नावे आहेत.

केडगाव अथर्व नगरमध्ये फाटक कुटुंब राहत असून कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे. सदरची घटना आज आजूबाजूच्या लोकांना कळाली त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या ठिकाणी पंचनामा केला असून एक चिट्ठी सुद्धा सापडली असून ती पोलिसांनी हस्तगत केलेली आहे

Back to top button