Travelअहमदनगरमहाराष्ट्र

अरे बापरे!पत्नीला चक्क विळीनेच मारले

अहमदनगर : अनेक वेळा पती पत्नीत वादविवाद होतात. कधी कधी यात मारहाण देखील केली जाते. मात्र नुकतीच पती पत्नीत झालेल्या वादातून पतीने पत्नीला चक्क भाजी कापण्याच्या विळीने
मारहाण केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर या गावामध्ये घडली. याप्रकरणी फिरोज पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की फिरोज याने घरगुती कारणावरून त्याची पत्नी शबाना पठाण यांना भाजीपाला कापण्याच्या विळीने मारहाण केली. या मारहाणीमध्ये शबाना यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्या हाता पायावर मुका मार लागला आहे. हे भांडण सोडवण्यासाठी शबाना यांचे वडील व आई यामध्ये पडले असता आरोपी फिरोज याने त्या दोघांना देखील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

Back to top button