महाराष्ट्र

अरे बापरे ! अन त्याने वडीलाच्याच डोक्यात चक्क लोखंडी घण घातला …

महासंदेश  : दारू पिऊन शिवीगाळ मारहाण करत असल्याच्या कारणावरुन अवघ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने वडीलाच्या डोक्यात चक्क लोखंडी घण घालून खुन केला आहे. हि घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडली आहे.
संतोष वाघिरे ( वय ४३ )रा. कान्हुरकरमळा, चिंचोशी रोड, (ता. खेड ), असे खून झालेल्याचे नाव आहे. या घटनेमुळे दावडी परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत खेड पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावडी गावचे हद्दीत कान्हुरमळा, चिंचोशी रोड, येथे मयत संतोष वाघिरे व त्यांचा १६ वर्षीय लहान मुलगा राहत होते. त्यांचा या म्हशी पालन व दुग्ध व्यवसाय आहे. वडिल संजय वाघिरे हे रोज दाऊ पिऊन १६ वर्षीय मुलाला शिवीगाळ मारहाण करून काम करण्यास लावत होते. १० तारखेला संजय वाघिरे १६ वर्षीय मुलाला दिवसभर शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर जेवायला न देता रात्री गोठयामध्ये झोपायला लावले. या कारणावरून मुलाला राग आल्याने गोठयातील लोखंडी घणाने संतोष वाघिरे यांच्या डोक्यात घाव घालून खून केला.

Back to top button