महाराष्ट्र

अरे बापरे ! इतक्या मोठ्या प्रामाणात ऑनलाईन तलवारी मात्र … !

महासंदेश : राज्यात शस्त्र बाळगण्यास परवाना आवश्यक आहे मात्र तरी देखील अनेकजण विनापरवाना शस्त्र वापरत आहेत . परंतु नुकतीच पोलिसांनी ऑनलाईन विनापरवाना धारदार शस्त्र मागवणाऱ्यासह तब्बल ४९ शस्त्र  जप्त केली आहेत.
औरंगाबाद येथील पुंडलिकनगर पोलिसांनी सेव्हन हिल येथे सापळा रचून ब्लू डार्ट कुरिअर सेवा देणारा छोटा हत्तीसह त्यातील पाच तलवारी जप्त केल्या होत्या. याप्रकरणी इंदिरानगर बाजीपुरा येथील दानिश खान याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते.
त्यानंतर रविवारी जिन्सी व पुंडलीकनगर पोलीस ठाण्याने संयुक्त कार्यवाही ऑनलाईन तलवार खरेदी करणा-या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी इरफान खान ऊर्फ दानिश खान व अय्युब खान  या दोघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून जिन्सी पोलिसांनी रविवारी ४१ तलवारी जप्त केल्या.  यामध्ये ६ कुकरी २ गुप्ती आणि ३६ तलवारी असे एकूण ४९ धारदार शस्त्र पोलीसांनी जप्त केले आहेत.
दरम्यान, सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ६ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Back to top button