अहमदनगरमहाराष्ट्र

अरे बापरे! कोरोनानंतर जिल्ह्याला ‘या’ आजाराचा विळखा!

अहमदनगर : म्युकर मायकोसिसचे रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यांना उपचारासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमुळे म्युकर मायकोसिसचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळले, आता तज्ञांच्या मते तिसरी लाट येणार आहे. या लाटेमध्ये सर्वाधिक दुष्परिणाम लहान मुलांवर होणार आहे व त्या लाटेचा संसर्ग देखील मोठ्या प्रमाणात होईल, असे तज्ञांच्या मते बोलले जाते. यासाठी अहमदनगर महापालिका उपाययोजना करण्यासाठी सज्ज आहे. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची हेळसांड कशी थांबवता येईल यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरवठा करून जिल्हा रुग्णालय येथे म्युकर मायकोसिसवर उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांची टीम तयार करण्यासाठी पाठपुरवठा करू तसेच महापालिकेच्या माध्यमातुन या रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेच्या महासभेत ५० हजारांची आर्थिक मदत शहरातील प्रत्येक रुग्णाला मिळावी. यासाठी पाठपुरवठा करणार असल्याचे मनपाच्या आरोग्यसमितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे यांनी सांगितले.
म्युकर मायकोसिस आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनपा आरोग्य समिती व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कान,नाक,घसा तज्ञ व डेंटल सर्जन यांची संयुक्त बैठकीत ते बोलत होते.

   यावेळी शहरातील डॉक्टरांनी या आजारासंदर्भात विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. यात हा आजार कोरोनापेक्षा भयंकर असून जीवघेणा आहे. या आजाराचे रुग्ण राज्याच्या तुलनेत नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या आजार संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती होने गरजेचे आहे, नागरिकांनीही या आजाराचे लक्षण आढळल्यास तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सद्या या आजाराच्या उपचारासाठी इंजेक्शनची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे परंतु इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे तरी इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत. याचबरोबर विविध उपाययोजना डॉक्टरांनी सुचविल्या आहेत.

Back to top button