Travelअहमदनगरमहाराष्ट्र

अरे बापरे! चक्क आईनेच मुलाला दगडाने ठेचले

अहमदनगर : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. आईची माया अगाध आहे. परंतु नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात चक्क आईनेच आपल्या मुलाची दगडाने ठेसून हत्या केल्याची  घटना समोर आली आहे.
नेवासा तालुक्यात सोहम या अवघ्या ८ वर्षांच्या मुलाचा मंगळवारी छिन्नविछिन्न केलेल्या अवस्थेत सोहमचा मृतदेह नागरिकांना आढळून आला होता. याप्रकरणी नेवासे पोलिसांत अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. यात पोलिसासह ग्रामस्थांना देखील या हत्येबाबत त्याच्या सावत्र बापावर संशय होता. मात्र पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच खरा खुनी शोधला. त्याची आई सीमा उत्तम खिलारे हिनेच त्याचे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची बाब समोर आली आहे.
घटनेनंतर सोहमचा मृतदेह पाहून टाहो फोडणाऱ्या त्याची आई सीमा हीने तपास दरम्यान पोलिसांची चांगलीच दिशाभूल केली. यावेळी तिने अनेकांवर संशय घेतल्याने पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मात्र मिनिटा-मिनिटाला ती पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला आणि तिनेच योजलेल्या योजनेत तीचअडकली. सोहमची हत्या त्याची आई सीमा उत्तम खिलारे हिनेच केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले असता तिला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या हत्याप्रकरणात आनखी काही आरोपी असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.  

Back to top button