अहमदनगरमहाराष्ट्र

अरे बापरे ! पिंजरा तोडून ‘तो’ झाला पसार आता … ?

अहमदनगर :  नागरी वस्तीत धुमाकूळ घालत असलेला बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. मात्र, त्याने पिंजरा तोडून, जमिनीला खड्डा करत पिंजऱ्यातून पलायन केल्याची घटना घडली. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाचीही चांगलीच धांदल उडाली आहे.ही घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली.
याबाबत सविस्तर असे, श्रीरामपूर तालुक्यातील खोकर, भोकर व कारेगाव परिसरात बिबट्याचे अनेकवेळा दर्शन होत असते. त्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, बोकड व कुत्रे फस्त केले आहेत. जनावरांसह महिला व पुरुषांवर देखील त्याने हल्ला केला होता, त्यामुळे या परिसरात वनविभागाने करण्यासाठी तब्बल नऊ पिंजरे लावले होते. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही त्यावेळी वनविभागाला रिकाम्या हातानेच परतावे लागले होते.
दरम्यान, मंगळवारी कारभारी शिंदे यांच्या शेतात बिबट्याला  जेरबंद करण्यासाठी परत पिंजरा लावला. त्या पिंजऱ्यात  बिबट्यासाठी भक्ष्य म्हणून एक शेळी व एक कोंबडा ठेवला होता. त्या पिंजऱ्यात बिबट्या  झाल्याचे शिंदे कुटुंबीयांच्या लक्षात आले. काहींनी घराबाहेर निघून त्या पिंजऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यावेळी एक बिबट्या  पिंजऱ्यात जेरबंद झाला होता तर दुसरा बिबट्या त्याला सोडविण्यासाठी पिंजऱ्याच्या बाजूने फिरत मोठमोठ्याने आवाज करत असल्याचे त्यांनी पहिले.  काही वेळाने दोन्ही बिबट्यांचा आवाज बंद झाला.
सकाळी या शेतकऱ्यांनी त्या पिंऱ्याकडे जाऊन पाहिले असता त्या पिंजऱ्याचा खालचा भाग तोडून, त्या खालची जमीन उकरून बिबट्याने पलायन केल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच वनविभागाशी संपर्क केला. वनविभागाचे मदतनीस सूर्यकांत लांडे यांनी भेट देऊन पाहणी करून हा पिंजरा तातडीने दुरुस्त करू किंवा दुसरा पिंजरा लावून देऊ असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button