अहमदनगरमहाराष्ट्र

अरे बापरे ! या तहसील कार्यालयाचे छत कोसळले

अहमदनगर : राहुरीच्या नायब तहसीलदार पुनम दंडिले यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्या बालंबाल बचावल्या. काल तहसील कार्यालयातील कामकाज सुरळीतपणे सुरू असताना अचानक छताचा काही भाग कोसळला. या घटनेमुळे काही काळ तहसील कार्यालयात चांगलीच धावपळ झाली.
राहुरी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार दंडिले या दुपारच्या दरम्यान आपल्या दालनामध्ये बसून कामकाज करत होत्या. त्यावेळी अचानक पीयुपीचे छत असलेला काही भाग कोसळून नायब तहसीलदार दंडिले यांच्या खुर्चीच्या फूटभर अंतरावर पडला. नशीब बलवत्तर म्हणून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, मोठा आवाज आल्याने तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच धावपळ झाली. त्यावेळी एक उदमांजर छताला असलेल्या पीयुपीच्या वरती पळत असताना पाहिले.

नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क करून वन विभागाच्या कर्मचार्‍यांना पाचारण केले वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी येऊन पाहणी केली. मात्र ते उदमांजर गेल्या दोन वर्षापासून तहसील कार्यालयात वावरत आहे. त्या उदमांजराला तहसीलच्या अनेक कर्मचार्‍यांनी पाहिले आहे. त्या उदमांजरा विषयी अनेकवेळा वन विभागाला महसूलने कळविले असता याकडे वनविभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे 

Back to top button