महाराष्ट्र

अरे बापरे हे काय भलतंच ! ‘ते’ दोघे जाब विचारायला गेले अन परत आलेच नाही.. ?

महासंदेश : फोनवरून शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांचा काठ्या, तलवारीने मारहाण करत डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील पाटसच्या परिसरातील तामखंडा येथील भानोबा मंदिरा समोर ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाले आहेत.

शिवम संतोष शितकल (वय २३) गणेश रमेश माखर (वय २३ ) दोघेही रा. पाटस (अंबिकानगर ता.दौंड.) असे खुन झालेल्या युवकांची नावे आहेत. याप्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत मोहन टुले दोघे रा.पाटस (तामखंडा ) , योगेश शिंदे ( रा. गिरिम ता.दौंड जि.पुणे )व इतर चार ते पाच आरोपी पसार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम शितकल आणि गणेश माखर यांना मन्या उर्फ महेश संजय भागवत याने फोन करून विनाकारण शिव्या दिल्या. शिव्या का दिल्या असा जाब विचारायला गेले असता आरोपींनी त्यांना काठ्या व तलवार आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आहे.

Back to top button