महाराष्ट्र

अरे बापरे! ॲसिड घेऊन जाणाऱ्या पीकअपचा अपघात महामार्गावर केमिकल : चालक जखमी

   महासंदेश : मुंबईकडे कॉन्स्टेंट ॲसिड घेवून निघालेल्या पिकअप वाहनाला सातारा शहरालगत असणाऱ्या महामार्गावरील वाढेफाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात महामार्गावर केमिकल पडल्याने त्यातून लालसर रंगाचा धूर बाहेर पडत असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातात अपघातग्रस्त पिकअपचा चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबतअधिक माहिती अशी की, सातारा एमआयडीसीतून मुंबईच्या दिशेने कॉन्स्टेंट ॲसिड घेवून निघालेल्या पिकअपला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाढेफाट्याजवळ आल्यानंतर अचानक गळती लागली. हा प्रकार लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून टँकर महामार्गाच्या एका बाजूला उभा केला. मात्र, वायुगळतीमुळे पिकअप वाहनाने पेट घेतल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीतकेली. दरम्यान या वायुगळतीमुळे घटनास्थळी असलेल्या काही लोकांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने भितीचे वातावरण तयार झाले होते.  

Back to top button