देश-विदेशमहाराष्ट्र

अरे हे काय : डेल्टा प्लसनंतर आता कप्पा व्हेरिएंट

महासंदेश  : गेल्या वर्षीपासून भारत देश कोरोनाचा सामना करत आहे. कोरोनामुळे एकीकडे देशातील कोरोनाची दुसरी लाट आता आटोक्यात येत असतानाच  डेल्टा प्लस या नवीन व्हेरिएंटचे नवीन संकट समोर आले. मात्र आता पुन्हा एकदा भारतासमोरील चिंता वाढणार असल्याचं चित्र आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट उत्तर प्रदेशमध्ये आढळून आला आहे. आता कोरोनाचा कप्पा नावाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे.

गोरखपूर आणि देवरियामध्ये डेल्टा प्लसचे दोन प्रकरण आढळून आल्यानंतर आता संत कबीर नगरमध्ये एक रुग्ण कोरोनाच्या कप्पा स्ट्रेन पॉझिटिव्ह सापडला आहे. 66 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. जीनोम सिक्वेंसींग अभ्यासादरम्यान या स्ट्रेनबद्दल समजून आलं.

Back to top button