देश-विदेशमहाराष्ट्र

अरे हे काय ! यांनी तर चक्क पंतप्रधान मोदींचाच फोटो हटवला ..!

महसंदेश : आतापर्यंत कोरोना लसीकरणानंतर लस घेतलेल्या व्यक्तीला देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापलेला असायचा. परंतू पश्चिम बंगालमध्ये आता लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात नागरिकांना देण्यात येणाऱ्या या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणारआहे.
केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर ममता बॅनर्जी यांनी आधीपासूनच प्रश्न उपस्थित केले होत.े त्याचसोबत त्यांनी देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे. यातच ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व मुख्य मंदिरातील पुजाऱ्यांना कोरोना विरोधी लस देण्याचे आदेश दिले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार आहे.
तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीवेळी कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला जात असल्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेत हे आचारसंहितेच्या नियमांचे भंग असल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. 

Back to top button