अहमदनगरमहाराष्ट्र

अवैध वाळू उपसा करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा

२४  लाखांचा मुद्देमाला नष्ट

अहमदनगर : कर्जत तालुक्यातीला गणेशवाडी शिवारातील भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी कर्जत पोलिसांनी ताब्यात घेत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. 

   सोमवार (दि.२४) रोजी गणेशवाडी शिवारातील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांना माहितीची शहानिशा करत कारवाई करण्याची सुचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ यांनी तात्काळ पथक तयार करत गणेशवाडी गाठली. यावेळी सदर पथकास तीन यांत्रिक बोटीच्या सहायाने भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी तिन्ही बोट आणि दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपली नावे लहू बबलू शेख, शौकत बच्चू शेख (दोघे रा. झारखंड) अशी माहिती दिली. यासह त्यांनी भरत बलभीम अमनर, शरद शेंडगे (वाटळूज ता.दौंड), दत्तात्रय विक्रम खताळ, अंकुश ठोंबरे (दोघे रा गणेशवाडी ता.कर्जत) या बोटी मालकांची नावे पोलिसांना दिली. यानुसार कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईत १५ लाख रुपये किमतीच्या ४३ फायबर बोटी, ९ लाख रुपयांच्या यांत्रिक बोटी असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक आणासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, तुलसीदास सातपुते, मारुती काळे, सुनील खैरे, सागर मेहत्रे, मनोज लातूरकर, भाऊसाहेब काळे, संपत शिंदे यांनी पार पाडली. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button