कृषी

आंब्याची लागवड कशी करावी

महासंदेश : आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे चार हजार वर्षापासून आंब्याची लागवड केली जाते. यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली गेली जात आहे. त्यापासून १२.१२ लाख मे.टन उत्पादन मिळते. आंबे लागवडीसाठी जमीन ही भारी प्रतीची, १.५ ते २.० मी. खोलीची तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी पाहिजे. आंब्याच्या हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, पायरी, लंगडा, वनराज या प्रकारच्या आंब्याच्या जाती आहेत.

पारंपारिक पद्धतीमध्ये आंब्याची अभिवृद्धी कोयापासून केली जाते. कोय कलम, मृदूकाष्ठ कलम, व्हिनियर कलम या पद्धतीद्वारे कलमे तयार करुन अभिवृद्धी करण्यात येते.

१० X १० मी. भारी जमिनीत, ९  X ९ मी मध्यम जमिनीत १ X १ X १ मी. आकाराचे खडे घेऊन शेपाखत (४०-५० किलो) + पोयटा माती + सिंगल सुपर फॉस्पेट (२ किलो) मिश्रणाने भरावे लागतात. आंब्याच्या झाडासाठी खाते ही एक वर्ष वयाच्या झाडास १५ किलो कंपोस्ट खत, १५० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद १०० ग्रॅम पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस चर खोदून द्यावेत.

 दरवर्षी ही मात्रा  समप्रमाणात वाढवून १० व्या वर्षापासुन प्रत्येक झाडास ५० किलो कंपोस्ट खत, १.५ किलो नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद व १ किलो पालाश बांगडी पद्धतीने जून महिन्यात दिली पाहिजे. तसेच पाण्याची उपलब्धता असल्यास फळधारणेनंतर ३-४ पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजे. तसेच आंब्याच्या बागेत आंतरपिके म्हणून १० वर्षापर्यंत भाजीपाला, द्विदल, शेंगवर्गीय, धैंचा, ताग यांसारखे पिके सुधा घेतली जाऊ शकतात.

आंबा फळे पक्वतेची काढावी. यावेळी फळांना लालसर रंगाची छटा आली पाहिजे. आंबा फळे १४ आणे (८५ %)  पक्वतेची काढावीत. यावेळी फळांना लालसर रंगाची   छटा येते. फळांचा रंग गर्द हिरव्यापासून फिकट होतो तसेच फळांच्या देठानजीक खोलगट भाग तयार होतो. यावेळी फळांची विशिष्ट घनता १.०२ ते १.०४ एवढी असावी.फळांची काढणी देठासहित करावी. फळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चारनंतर काढली पाहिजे.         

Back to top button