अहमदनगर

आगीत चार गाळे भस्मसात ; मोठी वित्तहानी

अहमदनगर : तपोवन रस्त्यावर एका ओपन प्लॉटमध्ये बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या गाळ्यांना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.या भीषण आगीत येथील चार गाळे भस्मसात झाले असून या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत महापालिकेच्या अग्नीशमन विभागास माहिती दिल्याने अग्नीशमनच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यत बरच नुकसान झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, तपोवन रस्त्यावरील संभाजी महाराज चौक येथील एका ओपन प्लॉटमध्ये काही पत्र्याचे गाळे बांधण्यात आले आहेत. दरम्यान शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक येथील गाळ्यांना आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्ष्यात आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्नीशमन विभागास दिली. ही माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी हजर होऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारन केले होते. त्यामुळे मनपाच्या अग्निशमन बंबासह एमआयडीसीच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले.आग मोठी असल्यामुळे शेजारी असलेले सहापैकी सुमारे चार गाळे आगीत पूर्णपणे भस्मसात झाले. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, आग लागल्यामुळे याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तर दुसरीकडे काही स्थानिक नागरिक, दुकानदार,नगरसेवकांनी आगीपासून नुकसान होवू नये म्हणून दुकानातून सामान बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मदत केली. परंतु येथील दुकानातील साहित्याने पेट घेतल्याने परिसरात सर्वत्र धुराचे लोट उसळत असल्याने ही आग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या. प्रत्येक मिनिटाला वाढत जाणारी गर्दी व त्यामुळे आग विझवण्यासाठी येणाऱ्या अडचणीमुळे तोफखाना पोलिसांनी बळाचा वापर करून नागरिकांना पांगवले. तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक सुरज मेढे आदींसह तोफखाना पोलिसांचे कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत बाजूला करत होते.
सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमनच्या जवानांना यश आले. या आगीत रामेश्वर ट्रेडर्स, श्रेया लेडीज शॉपी यासह आणखी दोन ते तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले

Back to top button