Uncategorized

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
राहुरी-नगर मतदारसंघातील 158 पैकी 80 ग्रामपंचायतींत निवडणुकीची रणधूमाळी
आ. तनपुरे यांच्या बालेकिल्ला मजबुत करण्याचा मनसुंबा ; शिवाजी कर्डिले यांनी कसली कंबर
नगर, दि.29 (प्रतिनिधी) – राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील 158 ग्रामपंचायतींपैकी 80 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्यामुळे आपले वर्चस्व राखण्यासाठी आजी-माजी आमदारांनीच कंबर कसली असून, प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
जून ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुका करोनामुळे लांबणीवर पडल्या होत्या. यात नगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया गतिमान झाली असून, बुधवारी (दि.30) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.  767 ग्रामपंचायतींचे तब्बल सव्वासात हजार सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी तब्बल साडेपंधरा लाख महिला, पुरुष मतदार मतदान करणार आहेत. येत्या 15 जानेवारीस मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून, मतमोजणी 18 जानेवारीस होणार आहे.
नगर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींवर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व होते. मात्र, गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही ग्रामपंचायतींनी कर्डिले यांना डावलून गृहनिर्माण राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे लक्ष्य भेदण्यासाठी माजी आमदार कर्डिले यांनी पुन्हा ग्रामपंचायतींवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे त्यांनी राहुरी-नगर व पाथर्डी मतदार संघातील 80 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी गाव बैठाका घेत कार्यकत्यांची जमवाजमव सुरू केली आहे.  
तसेच विद्यमान राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ही त्यामुळे मतदारसंघातील होण्यार्‍या निवडणुकींवर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे. त्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांना आगामी काळात मोठा फटका बसण्याची शक्याता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनी ही ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्तापित करण्यावर जोर दिला आहे.
चौकट…  
गावकीच्या राजकारणात भावकीत चुरशीची लढत?
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायत निवडणूक वेगळी असून, गावकीच्या राजकारणात भावकीतच मोठ्या प्रमाणात चुरशीची लढत होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजकीय पक्ष तसेच प्रतिष्ठित व्यक्तींना मानणारा गट सोडता इतर उणीदुणी काढण्यात गावकीचे राजगारण तापले आहे. त्यामुळे विकासाचे झेंडे घेवून फिरणारेच आता भावकीच्या राजकारणात पडले असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button