अहमदनगर

आज १६० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १०९ बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७७ टक्के

अहमदनगर: जिल्ह्यात आज १६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४७ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १०९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८७७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४९ आणि अँटीजेन चाचणीत ११ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, जामखेड ०२, कोपरगाव १०, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०३, पारनेर ०२, पाथर्डी ०६, राहता ०१, राहुरी ०१, संगमनेर ०१, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, जामखेड ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०२, नगर ग्रा. ०१, नेवासा ०२, पारनेर ०३, पाथर्डी ०१, राहता १५, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०२, श्रीरामपूर ०४ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ११ जण बाधित आढळुन आले. कोपरगाव ०४, नेवासा ०२, राहता ०२, राहुरी ०१ आणि श्रीगोंदा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, अकोले ०४, जामखेड ०१, कर्जत १३, कोपरगाव १९, नगर ग्रा. ०६, नेवासा १३, पारनेर १०, पाथर्डी ११, राहाता ०७, राहुरी ०६, संगमनेर ०९, शेवगाव १२, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,४७,२४१

उपचार सुरू असलेले रूग्ण:८७७

पोर्टलवरील मृत्यू नोंद:७०५५

एकूण रूग्ण संख्या:३,५५,१७३

Back to top button