अहमदनगर

आठ हजार लोकसंख्येच्या गावात फक्त १५० व्यक्तींना करोनाची लस

पिंपळगाव माळवीस लस उपलब्ध करण्याची मागणी

अहमदनगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी गावासाठी लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात झालेला नाही. त्यामुळे आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात आत्तापर्यंत दोन वेळाच १५० व्यक्तींचे लसीकरण झालेले आहे. करोणाच्या दुसऱ्याला लाटेत गावामध्ये बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

 नगर शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील आठ हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव माळवी हे गाव जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आहे. गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे, परंतु अद्याप गावात दोन वेळा प्रत्येकी दीडशे व्यक्तींचेच लसीकरण झाले आहे. आरोग्य विभागाने लोकसंख्येच्या प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करून गावात लसीकरण करण्याची मागणी पिंपळगाव माळवीच्या सरपंच राधिका प्रभुणे व ग्रामपंचायत सदस्य बापू बेरड यांनी केली आहे. वारंवार मागणी करूनही आरोग्य विभाग टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे लवकरच लसीकरण न केल्यास आंदोलनाचा इशारा सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.

Back to top button