अहमदनगरमहाराष्ट्र

आडते बाजार, डाळ मंडई सुरू करा ; काँग्रेसचे महसूल मंत्री थोरात यांना साकडे 

अहमदनगर: अत्यावश्यक सुविधा वर्गात मोडणारी दुकाने त्याचबरोबर भाजीपाला विक्रेते यांना सूट देण्यात आली आहे. मात्र या सगळ्यांचे ठोक विक्रेते असणारे व्यापारी हे आडते बाजार, डाळ मंडई या ठिकाणी आहेत. जोपर्यंत व्यापाऱ्यांची दुकाने उडत नाही तोपर्यंत किराणा दुकान साठी आवश्यक असणाऱ्या मालाचा पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. त्यासाठी आडते बाजार, डाळ मंडई तातडीने सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी यासाठी काँग्रेसने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे घातले आहे. 

तसेच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची समक्ष भेट घेऊन व्यापार्‍यांच्या प्रश्नावर चर्चा केली.महसूल मंत्री थोरात यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. प्रशासनाला या बाबतीमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
जवळपास मागील सलग दीड महिन्यांपासून संपूर्ण लॉकडाऊन सुरू आहे. तीन वेळा लॉकडाऊन प्रशासनाने केला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा गटात मोडणाऱ्या व्यापारी यांचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अत्यावश्यक सेवा सुविधा सुरू करण्याबरोबरच इतर व्यापाराला देखील सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाच्यावतीने प्रशासनाकडे केली होती. परंतु पहिल्या टप्प्यात डाळ मंडई, आडते बाजार सुरू करण्यात यावी यासाठी काँग्रेसच्या वतीने प्रशासनाकडे आग्रह धरण्यात आला आहे. 

Back to top button