अहमदनगरदेश-विदेशमहाराष्ट्र

…आता कोरोनाचे काही खरे नाही!

अहमदनगर : आता पर्यंत कोरोनाने अवघ्या जगाला वेठीस धरले होते. या काळात कोरोनाची बाधा झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कधी नव्हे इतकी मोठी हानी झाली आहे. कोरोनामुळे आज अनेकांचे संसार उध्दवस्त झाले आहेत तर अनेकांना कोणी वालीच राहीलेला नाही. मात्र आता या कोरोनाचे काही खरे नाही. कारण पुण्यातील एका कंपनीने तयार केलेल्या मास्कमुळे कोरोनाच्या विषाणूचा नायनाट होईल.

अत्यंत घातक असलेल्या कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याचे सर्वसामान्यांच्या हातात असलेले एकमेव व सर्वात मोठे शस्त्र म्हणजे मास्क होय. कोरोनामुळे आता मास्क हा जवळपास प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा एक भागच बनले आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात सर्जिकल, एन-९५, कापडी मास्कचा अधिक वापर केला जातो. अनेकजण तर आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या डिझाइनाचाही मास्क वापरतात. दरम्यान आता पुण्यातील एका कंपनीने असा मास्क तयार केला आहे, जो कोरोना व्हायरसवर भारी पडणार आहे. या मास्कच्या संपर्कात येताच कोरोनाचा व्हायरस निष्क्रिय होईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने  दिलेल्या माहितीनुसार, या मास्क थ्रीडी प्रिंटेड आहे. या मास्कवर अँटीव्हायरल घटक वापरण्यात आला आहे. हा लेप कोरोनाला निष्क्रिय करतो. त्यामुळे या मास्कच्या संपर्कात येताच मास्कच्या बाहेरच्या भागावरच व्हायरसचा खात्मा होतो. 

Back to top button