अहमदनगरमहाराष्ट्र

आता नगरमध्येच मिळणार ‘स्पुटनिक’ लस..!

अहमदनगर : आतापर्यंत लस घेण्यासाठी नागरिकांना खूप धावपळ करावी लागत होती. मात्र आता
रशियात संशोधन झालेली कोरोना प्रतिबंधक ‘स्पुटनिक व्ही’ लस नगर जिल्ह्यात प्रथमच साईदीप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता ही लस घेण्यासाठी कुठंही बाहेर जाण्याची गरज पडणार नाही.
प्रचलित लसीमध्ये स्पुटनिक व्ही अतिशय प्रभावी मानली जाते. आजपासून साईदीप हॉस्पिटलमध्ये ही लस उपलब्ध राहणार आहे अशी माहिती साईदीप हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीही उपलब्ध असून, स्पुटनिक व्ही ही लस प्रथमच साईदीप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. आज पासून रोज सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यन्त लस देण्यात येईल. या लसीच्या एका डोसची किंमत ११४५ रुपये तर दोन्ही डोसची एकत्र किंमत २२९० रुपये आहे. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस २१ व्या दिवशी घ्यायचा आहे. कोरोना प्रतिबंधासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरण सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

Back to top button