देश-विदेशमहाराष्ट्र

आता शिक्षकांसाठी ‘माझा विद्यार्थी -माझी जबाबदारी’

महासंदेश : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सध्या प्रदुर्भाव कमी होत असतनाच वैज्ञानिकांनी पुढील काळात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला आहे. या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना अधिक असल्याचा वैद्यकीय तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे आता या लाटेचा मुकाबला प्रभावीपणे आणि एकत्रितपणे करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी ‘माझा विद्यार्थी- माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

 संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात दूरदृश्यप्रणालीव्दारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सध्या १५०ऑक्सिजन बेड तयार केले आहेत. तसेच १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांची संबंधित यंत्रणांनी आठ दिवसात यादी तयार करण्याच्या सुचना केल्या.या काळात मुलांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांनी एक तास समुपदेशन करावे.तसेच पालकांना न घाबरण्याचे देखील आवाहन केले. या लाटेत लहान मुलांची त्याचबरोबर विद्यार्थ्यांची कशा पध्दतीने काळजी घेता येईल यासाठी येत्या चार दिवसात प्रोटोकॉल तयार केला जाईल, असेही ते म्हणाले.  

Back to top button