आता शेतकऱ्यांना एवढ्याला मिळणार ‘डीएपी’ची गोणी

महासंदेश : केंद्र सरकारने मागील काही दिवसांपूर्वी ‘डीएपी’ या खतावरील अनुदान वाढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार डीएपीच्या ५० किलोच्या एका गोणी वरील अनुदान ७०० रुपयांनी वाढवून आता १२०० रुपये करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या डीएपीवरील अनुदान वाढवण्याच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना डीएपीची गोणी १२०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. यानुसार, २४११ रुपयांचे डीएपीची एक गोणी शेतकऱ्यांना १२०० रुपयांना मिळेल. केंद्र सरकारने डीएपीवरील सबसिडी १४० टक्के वाढवल्याचं म्हटले आहे. कोरोनामुळे आखाती देशांत डीएपी खताच्या निर्मिती मध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची किंमत वाढवल्यामुळे डीएपी खताच्या किंमती वाढल्या असल्याचं सांगण्यात आले आहे. खतांच्या वाढत्या किंमतीवरुन शेतकरी आक्रमक झाल्यानंतर केंद्र सरकारने खतावरील सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांना ‘डीएपी’ खरेदी करण्यासाठी आता १२०० रुपये द्यावे लागतील. ‘डीएपी’ खरेदी करताना शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड किंवा शेतकरी कार्डची प्रत द्यावी लागणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याचे ठसे द्यावे लागतील. त्यानंतर केंद्र सरकार संबंधित कंपनीच्या खात्यात अनुदान जमा करेल. केंद्र सरकार एका गोणीमागे तब्बल १२११ रुपये कंपन्यांना अनुदान देणार आहे. डीएपीवरील अनुदानासाठी केंद्र सरकार १४ हजार ७७५ रुपये खर्च करणार आहे.