अहमदनगरमहाराष्ट्र

आदिवासींच्या शिक्षणावर खर्च गरजेचा : ना.तनपुरे

महासंदेश : आदिवासींच्या मुलांना शिक्षणासाठी खर्च करणे गरजेचा असुन त्यातुन भविष्यात आदिवासी समाजाची पिढी घडणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.     खावटी अनुदान योजने अंतर्गत किराणा वाटपाच्या कार्यक्रमाचा नगर जिल्ह्यातील शुभारंभ आढाववाडी येथे करण्यात आला. त्याप्रसंगी बोलताना नामदार तनपुरे यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी खर्च करणे गरजेचे असून आदिवासी वस्ती वरील शाळा डिजिटल होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यातून आदिवासींच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळुन भविष्यात एक चांगली पिढी निर्माण होईल.     कोरोना काळात ठप्प झालेली विकास कामे सुरू करण्यात आली असून मागील सरकारच्या योजनेत खावटी कर्ज दिले जात होते ते बंद करून आम्ही अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थ्याला दोन हजार रुपये बँक खात्यात व दोन हजार रुपयाचे अन्नधान्य असे याचे स्वरूप आहे. प्रत्येक लाभार्थ्याला किराणा भेटणे गरजेचे असून त्यासाठी मध्यस्थी, ठेकेदारी नको. आदिवासी समाजाच्या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. जातीचे दाखले, आधार कार्ड यासाठी कॅम्प घेण्यात येणार आहेत.विखुरलेल्या आदिवासी समाजाला फक्त वैयक्तिक लाभाच्या योजना देता येतात येथे भांडवली खर्च करता येत नाही, असे तनपुरे यांनी सांगितले. 

Back to top button