Uncategorizedअहमदनगरमहाराष्ट्र

आधी लगावली कानशिलात नंतर जोडले हात

आधी लगावली कानशिलात नंतर जोडले हात
एमआयडीसीच्या सहायक पोलीस निरीक्षकाकडून मुख्याध्यापकास मारहाण
डोंगरगणात ग्रामस्थांकडून तब्बल दोन तास मतदानावर बहिष्कार
नगर, दि.15 (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील डोंगरगण येथे अर्धांगवायूचा झटका आलेल्या मातोश्रींना मतदान केंद्रावर घेऊन जात असताना कोणतीही विचारपूस न करता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी मुख्याध्यापकास बेदम मारहाण केली. ही घटना सकाळी आकराच्या सुमारास घडली. या प्रकाराने संतप्त झालेले गावकरी एकत्र येत बोरसे यांच्या अन्यायाच्या विरोधाती मतदान प्रक्रियेवर तब्बल दोन तास बहिष्कार टाकला. त्यामुळे बराच वेळ मतदान प्रक्रिया बंद होती. प्रांताधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण शांत केले. त्यानंतर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाले.
नगर तालुक्यातील डोंगरगण ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि.15) मतदान प्रक्रिया सुरळीत चालू होती. त्यावेळी बोरसे साहेब हे पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले. त्याचवेळी मतदान केंद्राच्या परिसरात असणार्‍या वाहनांवरून गावकर्‍यांशी चकमक झाली. त्याचवेळी गणपतराव मते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय भूतकर हे आपल्या मातोश्रींना घेऊन मतदान करण्यासाठी चालले होते. त्यांच्या मातोश्रींना अर्धांगवायूचा आजार असल्याने मतदान केंद्रापर्यंत वहानात घेवून जावे अशी परवानगी संबंधित पोलीस कर्मचार्यांकडून घेतली होती. व तशी सवलतही निवडणूक आयोगाने दिली आहे. असे असतानाही बोरसे साहेबांनी मुख्याध्यापक भूतकर यांना अरेरावी व शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या पत्नीसही धक्काबुक्की केल्याचे भूतकर यांनी सांगितले.
सराईत गुन्हेगारांवर पोलिसी खाक्या न दाखविणारे सपोनि बोरसे ह्यांनी साहाय मुख्याध्यापकास मारहाण करून काय सिद्ध केले असा सवालही यावेळी ग्रामस्थामधून उपस्थित होत आहे. या प्रकाराने संतप्त झालेले गावकरी एकत्र येत बोरसे साहेबांच्या अन्यायाच्या विरोधाती मतदान प्रक्रियेवर तब्बल दोन तास बहिष्कार टाकला. त्यामुळे महसूल यंत्रणाही खडबडून जागी झाली. बराच वेळ मतदान प्रक्रिया बंद होती. प्रांताधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण शांत केले. यावेळी गावकर्‍यांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती. त्यानंतर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली. सत्ताधारी अन् विरोधक यांच्यात कोणाचीही काहीही तक्रार नसताना बोरसे यांनी जाणीवपूर्वक अरेरावी करत मारहाण केली, असा आरोप ही भुतकर यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button