अहमदनगरदेश-विदेशमहाराष्ट्र

आमदार रोहित पवार म्हणतात : आज देशाला ‘याची’ खरी गरज !

 अहमदनगर :  सध्या देशात कोरोनाचा धुमाकुळ सुरू आहे. त्या संकटातून नागरिक पुरते सावरत नाहीत तोच परत म्युकर मायकोसीस नावाच्या आजाराने आपने बस्तान बसवले आहे. त्यामुळे नागरिक आता पुरते वैतागलेेले आहेत. त्यामुळे आज कोरोनापासून बचाव करण्यासाठी देशाला लसीकरणाची सर्वात जास्त गरज आहे. असे मत कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र ट्विटरव्दारे व्य्त केले आहे.
लसीकरणासाठी आरबीआयकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी वापरावेत असा सल्ला देखील त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
आपल्या या ट्विटमध्ये पवार म्हणतात, देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला करोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आणि रिझर्व बँकेकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील. राज्ये स्वत:च्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथं करोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि जीएसटीमध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण ठरवावं. असं केलं तर करोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button