Travelअहमदनगरमहाराष्ट्र

आरक्षणासाठी भाजप एकवटले

अहमदनगर : ओबीसीचे घटनेने दिलेले आरक्षण काढून घेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारमुळे झाले. महाविकास आघाडीने योग्य ती बाजू सुप्रीम कोर्टात मांडली नाही त्यामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. जोपर्यंत ओबीसीचे आरक्षण पुनर्स्थापित करत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होता कामा नये असा इशारा माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने शनिवारी (दि. २६) शहरातील सक्कर चौकात सकाळी दहा वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
माजी मंत्री शिंदे पुढे म्हणाले, आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारने केले. हे सरकार टाईमपास सरकार आहे. कोणीच कोणाचं ऐकत नाही हा या तीन पक्षाच्या सरकारचा समान कार्यक्रम आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डीले म्हणाले, महा विकास आघाडी सरकारचा एकमेकांमध्ये विचार नाही. महा आघाडी सरकारने ज्यावेळेस लक्ष देण्याची गरज होती त्यावेळेस लक्ष न दिल्यामुळे आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.
खा. सुजय विखे म्हणाले, मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला या संदर्भात योग्य ती मांडणी ची बाजू राज्य सरकार कडून झाली पाहिजे होती. ती न झाल्यामुळे आज ही सगळी वेळ तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी व मराठा समाजावर आलेली आहे. यामहा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाला विरोध करण्यासाठी चक्काजाम आंदोलन महाराष्ट्रभर केले जात आहे. चक्का जाम आंदोलनामुळे वाहनाच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या .

Back to top button