देश-विदेशमहाराष्ट्र

आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा

कोल्हापुरात मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

महासंदेश : मराठा आरक्षणा बाबत निर्णय घेण्यासाठी राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन तातडीने बोलवा या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक बनला आहे.

सकल मराठा समाजातर्फे कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे शुक्रवारी (दि.२८) या ठिय्या आंदोलनाला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. या आंदोलनात विविध पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवत आंदोलनाला पाठिंबा दिला. काळ्या फिती लावून आणि जोरदार घोषणा देत आंदोलक कार्यकर्त्यांनी लक्ष वेधून घेतले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भाजप कार्यकारिणी सदस्य महेश जाधव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, निवास साळोखे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, यांच्यासह विविध संघटना, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button