Travelअहमदनगरमहाराष्ट्र

आली… रे.. आजपासून लाल परी रस्त्यावर!

अहमदनगर : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून आगारात उभी असलेली लाल परी आजपासून परत एकदा रस्त्यावर धावणार आहे.
५० टक्के फेऱ्यांसह शंभर टक्के क्षमतेने लालपरी सुरू होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांसह प्रवासास जाणाऱ्या बसची स्वच्छता केली आहे.  त्यामुळे कोरोनाच्या बंधनात अडकलेला एसटीचा, तसेच सुन्या पडलेल्या बसस्थानकांचा व प्रवाशांचा श्वास खुला होणार आहे.

प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी अर्थात एसटीच्या कार्यकाळास एक जून रोजी ७३ वर्ष पूर्ण झाली. कोरोनामुळे अहोरात्र धावणारी एसटी मागील वर्षीपासून डेपोमध्ये हाताशपणे होती. कोरोनाची पहिली लाट ओसरल्याने लालपरीची सेवा रुळावर येत असतानाच या वर्षी मार्च अखेरीस कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे परत एकदा एसटीची सेवा बंद केल्याने तीला ब्रेक लागला. कोरोना काळाच्या आधी सामान्य स्थितीत नगर विभागाचे दिवसाकाठीचे सरासरी उत्पन्न ७० लाख होते.पहिल्या लाटेत करोडोचे नुकसान झाले. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व व्यवहार सुरू करण्याचे आदेश दिल्याने लाल परी देखील परत एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.

Back to top button