देश-विदेशमहाराष्ट्र

आषाढी होणारच परंतु ..!

महासंदेश : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी खंडित झालेली वारी या वर्षी महाराष्ट्रात आषाढी वारी होणार. परंतु या वर्षी देखील कोरोनाचे संकट कायम असल्याने वारीसाठी फक्त दहा पालख्यांना बसने जाण्याची परवानगी दिली आहे. पालखीसोबत निवडक वारकरी वारीला जातील.
पुण्यात आषाढी वारी संदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. दहा पालख्या वीस बसमधून पंढरपूरमध्ये जातील. मुख्य मंदिर भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंद राहील. पालखीसोबतचे वारकरी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन विठुरायाचे दर्शन घेतील. कोरोनानियमांचे पालन करुन वारी पार पडेल.
वारीत सहभागी होणार असलेल्या सर्वांना आधी क्वारंटाइन केले जाईल. क्वारंटाइनचा कालावधी संपताच कोरोना चाचणी होईल. ही चाचणी निगेटिव्ह आली तरच संबंधित व्यक्ती वारीत सहभागी होऊ शकेल.
प्रत्येक पालखीसोबत जास्तीत जास्त ४० वारकरी बसमधून पंढरपूरला जातील. पायी वारीला मनाई आहे. शासकीय महापूजा मागच्या वर्षीप्रमाणे निर्बंध पालून होईल.  

Back to top button