अहमदनगरबॉलिवुड गॉसिपमहाराष्ट्र

आ. रोहित पवार जेव्हा सैराटमधील परश्याची भूमिका साकारतात तेव्हा…

अहमदनगर : अचानक आमदार रोहित पवार यांचा ताफा कर्जत तालुक्यातील गायकरवाडी कोव्हीड सेंटरकडे वळतो. यावेळी तेथील करोनाबाधितांसाठी मनोरंजनासाठी चित्रपटातील गीतांचा कार्यक्रम सुरू असताना अनेक करोना रुग्ण त्यावर थिरकत असतात. त्याच वेळी कर्जत जामखेडचे लोकप्रिय आ. पवार कोव्हीड सेंटरमध्ये दाखल होताच सैराटमधील झिंगाट गाणे सुरू होते आणि आमदार त्यांच्यासाठी परश्याची भूमिका घेत जेव्हा ठेका धरतात यावेळी सगळेच करोना रुग्णनी आपले दुःख बाजूला सारत त्यांना साथ देेत नाचण्याचा मनमुराद आनंद घेतात.
सोमवार, दि २४ रोजी कर्जत-जामखेडचे आ रोहित पवार यांनी कर्जत तालुका पंचायत समितीमध्ये करोना आढावा बैठक संपन्न केली. दिवसभर अनेक ठिकाणी आ. पवार यांनी सांत्वन भेट देखील केल्या. दुपारी ४:३० वाजता अचानक आ. पवार यांनी गायकरवाडी कोव्हीड सेंटरकडे आपला ताफा वळविला. यावेळी तेथे उपचार आणि कोरोन्टाईन असलेल्या करोनाबाधीत रुग्णाच्या मनोरंजनासाठी तुषार घोडके यांचा चित्रपटातील गीतांचा कार्यक्रम सुरू होता. आ पवार यांचा प्रवेश होताच त्यावेळी सैराट चित्रपटातील झिंगाट गाणे सुरू झाले. करोना रुग्णाशी सवांद साधण्यासाठी आलेले रोहित पवार यांनी लागलीच झिंगाट गाण्यावर ठेका धरत करोना रुग्णासोबतच डान्स सुरू केला. यावेळी एक वयोवृद्ध आजींनी देखील तालावर ठेका धरत तेथील गंभीर वातावरण मोकळे केले. यावेळी अनेक महिला आणि लहान मुलांनी आ. पवार यांच्याबरोबर ठेका धरत नाचण्याचा मनमुराद आनंद घेतला. त्या चार मिनिटांसाठी रोहित पवार करोना रुग्णांसाठी परश्याच ठरले. आणि त्या चार मिनिटात गंभीर वातावरण पुरते मनोरंजक केले. यावेळी आ. पवार यांच्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, राष्ट्रवादीचे नितीन धांडे, प्रा विशाल मेहत्रे, भास्कर भैलुमे, सुनील शेलार, दीपक यादव, सागर लोंढे, गणेश नलवडे, मनोहर गायकवाड आदीनी देखील थिरकण्याचा आनंद घेतला.

2,988 Comments

  1. Substantially, the post is really the best on this laudable topic. I concur with your conclusions and will eagerly watch forward to your future updates.Just saying thanx will not just be enough, for the wonderful lucidity in your writing.

  2. of course like your web-site however you have to check the spelling on several of your posts. Many of them are rife with spelling problems and I find it very troublesome to tell the reality then again I will surely come back again.

  3. I was referred to this web site by my cousin. I’m not sure who has written this post, but you’ve really identified my problem. You’re wonderful! Thanks!

  4. While this issue can vexed most people, my thought is that there has to be a middle or common ground that we all can find. I do value that you’ve added pertinent and sound commentary here though. Thank you!